धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून वडिलांचा खून

एका अल्पवयीन मुलाला वडिलांनी मोबाईलवर गेम खेळत असताना रागवले यामुळे त्याने रागात येऊन स्वतःच्याच वडिलांचा गळा दाबून खून केला आहे.
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून वडिलांचा खून
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून वडिलांचा खूनSaam Tv

सुरत: एका अल्पवयीन मुलाला वडिलांनी मोबाईलवर गेम खेळत असताना रागवले यामुळे त्याने रागात येऊन स्वतःच्याच वडिलांचा गळा दाबून खून केला आहे. आणि स्वतःच्या बचावासाठी त्याने बाथरुममध्ये पडून वडिलांच्या जखमी झाल्याची खोटी कहाणी रचली.

हे देखील पहा-

प्राप्त अहवालांनुसार, हे प्रकरण सुरतमधील हजीरा रोडवर असलेल्या कवास गावाचे आहे. त्याने खोटी कहाणी रचली पण डॉक्टरांच्या संशयावरून फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम द्वारे, खून झाल्याचे उघडकीस आले आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना मंगळवारी शहराच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेव्हा त्यांची पत्नी डॉली आणि मुलगा दोघेही डॉक्टरांसमोर म्हणाले की, ते आठवड्यापूर्वी बाथरूममध्ये पडले होते. आणि मंगळवारी संध्याकाळी झोपेतून उठले नाहीत.

धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून वडिलांचा खून
Drugs Case: रकुल प्रीत ईडीच्या कार्यालयात

पण याबद्दल अधिक चौकशी केल्यावर मुलाने सांगितले की, त्याचे वडील नेहमीच त्याला दिवसभर मोबाईल फोनवर गेम खेळल्याबद्दल रागावत होते. ज्यामुळे एकदा आई बाहेर गेली होती, वडिलांनी दोघांना फटकारले तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले. आणि त्याने काबुल केले की, मी वडिलांचा गळा दाबून खून केला.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com