...तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा; ओवैसींचं राहुल गांधींना आव्हान

राहुल गांधींनी आपण TRS भाजपा आणि MIM ला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं वक्तव्य केलं होतं.
...तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा; ओवैसींचं राहुल गांधींना आव्हान
Asaduddin owaisi/ Rahul GandhiSaam TV

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ते तेलंगणा दौऱ्यावर असताना आपण टीआरएस, BJP आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं वक्तव्य केलं होतं. राहूल यांच्या याच वक्तव्यावरुन आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर हैदराबादमधून (Hyderabad) निवडणूक लढवून दाखवा' असं ओवैसी म्हणाले आहेत.

ते म्हणाले, राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत, त्यांनी हिंमत असेल तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी, नाहीतर मेडकमधून नशीब आजमावून पाहावे. पण तुम्ही वायनाडमध्ये हरणार आहात असं म्हणत ओवैसी यांनी गांधीना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे तेलंगणा दौऱ्यावर असताना आपण TRS भाजपा आणि MIM ला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं विधान केलं होतं. त्याला आता ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Asaduddin owaisi/ Rahul Gandhi
'आसानी' चक्रीवादळामुळे 'या राज्यात' मुसळधार पाऊस

टीआरएससोबत युती होऊ शकत नाही असं देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. तेलंगणा राष्ट्र समितीसोबत (TRS) कोणत्याही प्रकारची युती होऊ शकत नाही. टीआरएसशी युती करू इच्छिणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी टीआरएस किंवा भाजपमध्ये जावं. तसंच कोणी केसीआर यांच्याशी युती करण्याचा विचार करत असेल तर त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंगलमध्ये म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.