बाबानों! स्वखर्चानं लस टोचून घेतलीय; पहिल्यांदा मोदींचा फोटो हटवा बरं

कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे
बाबानों! स्वखर्चानं लस टोचून घेतलीय; पहिल्यांदा मोदींचा फोटो हटवा बरं
बाबानों! स्वखर्चानं लस टोचून घेतलीय; पहिल्यांदा मोदींचा फोटो हटवा बरंSaam Tv

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा मोठा कहर आपण बघितलं आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल ३ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. मात्र लसीकरण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या लसीकरण सर्टिफिकेटवर नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. या फोटोवर अनेकांचा मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला आहे. आणि विरोध केला आहे. यादरम्यान आता केरळ मधील एका व्यक्ती थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मोदींचा फोटो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

स्वतःच्या पैशाने लस घेतली आहे. यामुळे सर्टिफिकेटवर असलेला मोदींचा फोटो हटवा असे म्हटले आहे. एक सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश पी.बी. सुरेश कुमार यांनी केंद्र आणि राज्य सरकार याच्या मते मांडण्यासाठी २ आठवड्यांचा अवधी देखील देण्यात आला आहे. याबाबत याचिका दाखल केली आहे. कोट्टायम मधील एम. पीटर नावाच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने. सध्याचे लस प्रमाणपत्र हे नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे. यावरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यात यावा, अशी मागणी या व्यक्तीने आपल्या याचिकेमध्ये केली आहे.

सरकारी लसीकरण केंद्रावर स्लॉटच उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन ७५० रुपये देऊन लस घ्यावी लागत आहे. यामुळे मोदींना लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावून याचे क्रेडिट घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्याचे या याचिकेत मध्ये मांडले आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लस प्रमाणपत्रावर फोटो किती औचित्यपूर्ण आहे, असा सवाल या याचिकेमार्फत केला जात आहे. अमेरिका, इंडोनेशिया, इस्रायल, कुवैत, फ्रान्स आणि जर्मनी या देशात लस प्रमाणपत्रांच्या कॉपी देखील या याचिकाकर्त्याने हायकोर्टाकडे सादर केले आहेत.

बाबानों! स्वखर्चानं लस टोचून घेतलीय; पहिल्यांदा मोदींचा फोटो हटवा बरं
क्रूरता ! …संतप्त घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या

या लस प्रमाणपत्रावर आवश्यक ती माहिती असून अनावश्यक कसलाही भाग नसल्याचे सांगितले जात आहे. याचिकाकर्त्याचा असा ही दावा आहे की, पंतप्रधान मोदींचा फोटो लस प्रमाणपत्रावर लावल्याने लोकहिताकरिता काही महत्त्वाचे काम घडणार नाही. परंतु, त्यांचा फोटो हटवल्यावर देखील राज्याच्या अथवा केंद्रात कोणत्याही धोरणाचे उल्लंघन होणार नाही. याचिकेकर्त्याने असा युक्तिवाद केला आहे की, कोरोना महासाथीच्या विरूद्धचा लढा हा सध्या जनसंपर्क आणि एखाद्या मीडिया मोहिमेमध्ये रुपांतरित झाला आहे. हा लढा म्हणजे 'वन मॅन शो' असल्याचे भासवले जातं आहे. मात्र, मला पंतप्रधान मोदींच्या फोटोशिवाय असलेले लस प्रमाणपत्र मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा ठाम दावा या याचिकाकर्त्याने केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.