Sweden and Finland
Sweden and FinlandSaam Tv

रशियाला धक्का; 'हे' दोन देश आज नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी सादर करणार अर्ज

तुर्की ने दोन्ही देशांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर स्वीडन आणि फिनलंड (Sweden and Finland) नाटोमध्ये सामील होण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाला धक्का बसला आहे. परंतु, तुर्की ने दोन्ही देशांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन म्हणाल्या, 'मला आनंद आहे की आम्ही एकच मार्ग निवडला आहे आणि आम्ही हे एकत्र करू शकतो.' (Finland and Sweden announced they will submit their bids to join NATO)

Sweden and Finland
Indrani Mukherjea Bail: शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला अखेर जामीन

त्यांनी मंगळवारी फिनिश राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फिनलँडची 1,300 किलोमीटरची सीमा रशियाशी सामायिक आहे आणि स्वीडन देखील युक्रेनवर झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळले आहे. दोन्ही देश आज बुधवारी आपले अर्ज देत आहेत. नाटोमध्ये सामील होण्यासाठी फिनलंडच्या संसदेत मतदान झाले असून त्यात खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले आहे. संसदेत या बाजूने मतदान झाले आहे. यामुळे गेल्या 75 वर्षांपासून फिनलंडची अलाइनमेंट येथे संपुष्टात येणार आहे.

हे देखील पहा-

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी इशारा दिला की रशिया नाटोच्या प्रयत्नांवर आपली प्रतिक्रिया देऊ शकतो. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग (Jens Stoltenberg) यांनी सांगितले आहे की दोन्ही देशांचे स्वागत खुल्या हातांनी केले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com