Archana Gautam News: अर्चना गौतमचा प्रियांका गांधींच्या पीएवर गंभीर आरोप; तक्रारीनंतर गुन्हाही दाखल

Priyanka Gandhi's PA Misbehaved: अर्चना गौतमचे वडील गौतम यांनी आरोप केला आहे की, संदीप सिंह यांनी आपल्या मुलीबाबत जातीवाचक उल्लेख केला
Archana Gautam
Archana Gautam Saam TV

लखनौ : 'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चनाच्या वडिलांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्याविरोधात मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

अर्चनाचे वडील गौतम यांनी आरोप केला आहे की, संदीप सिंह यांनी आपल्या मुलीबाबत जातीवाचक उल्लेख केला, तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. मेरठ पोलिसांनी आता याप्रकरणी आयपीसी कलम ५०४, ५०६ आणि एससी एसटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Archana Gautam
Dombivli News: डोंबिवलीत फुगे फेकण्यावरून दोन गटात राडा, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

गौतम यांनी सांगितलं की, अर्चना बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नाहीत. अर्चनाला २६ फेब्रुवारीला प्रियांका गांधी यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी संदीप सिंह यांनी रायपूर छत्तीसगडला बोलावले होते. अर्चनाने प्रियंका गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली, पण पीए संदीप सिंग यांनी नकार दिला.

Archana Gautam
Accident News : अहमदनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर तिघेजण जखमी

अर्चनाच्या वडिलांचा आरोप आहे की संदीप सिंह यांनी आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केले. त्यांनी धमकी देत जातीवाचक शब्दही उच्चालले. त्यानंतर अर्चनाच्या वडिलांनी संदीप सिंग विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अर्चनाने म्हटलं की, संदीप यांनी तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती. अर्चनाच्या वडिलांनीही मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी देखील केली. (Latest News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com