Bihar Violence: प्रसिद्ध Youtuber खान सर यांच्यासह 400 जणांवर FIR दाखल...

Bihar Violence: त्यांच्या व्हिडिओमुळेच आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असा आरोप खान सर यांच्यावर करण्यात आला आहे.
Bihar Violence: Fir Against Khan Sir
Bihar Violence: Fir Against Khan SirSaam Tv

पटना: रेल्वे भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप करत बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण लागले होते. संतप्त विद्यार्थ्यांनी गया (Gaya, Bihar) येथे ट्रेनचे इंजिनच (Train) पेटवून दिले होते. याप्रकरणी आता एकूण ४०० जणांवर गुन्हा दाखल (FIR) झाला आहे. विशेष म्हणजे यात प्रसिद्ध यूट्यूबर (Youtuber) खान सर (Khan Sir) यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या व्हिडिओमुळेच आंदोलनाला हिंसक (Violence) वळण मिळालं असा आरोप खान सर यांच्यावर करण्यात आला आहे. (FIR registered on 400 protesters including khan sir for Bihar violence)

हे देखील पहा -

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (NTPC) नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षाचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याच मुद्द्यावरुन बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि रेल्वे भरती बोर्डाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरले. बिहारमधील गया जिल्ह्यात बुधवारी याच आंदोलनादरम्यान एका ट्रेनला आंदोलक विद्यार्थ्यांनी आग लावली होती. ही हिंसा करण्यासाठी खान सरांचा एक व्हायरल व्हिडिओ बघून आपण जाळपोळ केली हे काही विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे.

Bihar Violence: Fir Against Khan Sir
Pune : धर्माची बंधन झुगारत, रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लीम विवाह सोहळा पार

कोण आहेत खान सर?

खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. यूट्यूबवर (Youtube) त्याचं खान जीएस रिसर्च सेंटर (Khan GS Research Centre) या नावाने एज्युकेशनल चॅनेल आहे. स्पर्धा परिक्षा आणि सामान्य ज्ञान ते आपल्या चॅनेलमधून देत असतात. त्यांच्या शिकवण्याची पद्धत, विषय सोपा करुन सांगण्याची कला आणि एकुणच त्यांची बोलण्याची शैली यामुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. मागच्याच वर्षी खान सर यांचं खरं नावं काय, ते नक्की हिंदु आहेत की मुस्लिम यावरुनही ते चांगलेच चर्चेत आले होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com