Firing On Airplane: 3500 फूट उंचीवर विमानावर गोळीबार, 63 प्रवाशांसह उडणाऱ्या विमानात पुढे जे घडलं...

विमान राज्याची राजधानी काया लोइकाव येथे उतरणार होते. या दरम्यान विमानावर अचानक हा हल्ला झाला.
Airplane
AirplaneSaamr Tv

नवी दिल्ली : म्यानमारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याचा प्रकार येथे समोर आला आहे. जमिनीवरुन हा हल्ला करण्यात आला आणि गोळी 3500 फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात बसलेल्या व्यक्तीला लागली. गोळी लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या व्यक्तीला लँडिंगनंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Airplane
फुटबॉलच्या इतिहासातील काळरात्र; इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा मृत्यू

म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या या विमानात ६३ प्रवासी प्रवास करत होते. विमान राज्याची राजधानी काया लोइकाव येथे उतरणार होते. या दरम्यान विमानावर अचानक हा हल्ला झाला. या घटनेशी संबंधित अनेक धक्कादायक चित्रे समोर आली आहेत. चित्रांमध्ये विमानारवरील गोळ्यांची छिद्रे दिसत आहेत. तर एक पुरुष प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात बसलेला असून त्याच्या मानेजवळ गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi NEws)

काया या पूर्वेकडील राज्यातील लष्कर आणि बंडखोर गटाने गेल्या फेब्रुवारीमध्ये देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला उलथून टाकल्यानंतर आणि ताब्यात घेतल्यापासून तीव्र संघर्ष करत आहेत.

Airplane
मालकीणीने नोकरासोबत थाटला संसार, आंधळ्या प्रेमाची कहाणी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

म्यानमारमधील लष्करी सरकारच्या नेत्याने देशातील निवडणुकांच्या तयारीसाठी आणीबाणीची स्थिती आणखी सहा महिने वाढवण्याची घोषणा केली. पुढच्या वर्षी या निवडणुका होतील, असेही या नेत्याने सांगितले.

आंग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून गेल्या वर्षी १ फेब्रुवारी रोजी लष्कराने सत्ता हस्तगत केली होती. लष्कराने नोव्हेंबर 2020 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कथित फसवणुकीचा उल्लेख केला, ज्यामध्ये स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने मोठा विजय मिळवला तर सैन्य-समर्थित पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com