Viral Video: आधी गर्दीत पळवलं अन् मग...; पोलिसांकडून मोबाईल चोराला सिनेस्टाईल अटक

मोबाईल चोरीची ही घटना बुधवारची आहे. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. त्यानंतर चौकशीत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
Viral Video: आधी गर्दीत पळवलं अन् मग...; पोलिसांकडून मोबाईल चोराला सिनेस्टाईल अटक
Police Arrested Mobile Snatchers In Filmy StyleTwitter/@ANI

कर्नाटक: मंगळुरू पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने चोरट्याला फिल्मी स्टाईलमध्ये पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपाखाली तिघांना अटक केली आहे.

वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीची ही घटना बुधवारी घडली आहे. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. त्यानंतर चौकशीत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. वृत्तसंस्थेने ट्विटरवर ट्विट केलेल्या फोटोमध्ये पोलिस कर्मचारी गुन्हेगाराला पकडताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोत गुन्हेगाराला अटक करतानाही दिसत आहे. (Police Arrested Mobile Snatchers In Filmy Style)

शहर पोलिस आयुक्त एन शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन जणांना पळताना दिसले. त्यानंतर कारवाई करताना दोघांना पकडण्यात आले. चौकशीत एक व्यक्ती पीडित असल्याचे निष्पन्न झाले, तर दुसऱ्यावर मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. पीडित महिला परप्रांतीय मजूर असून दोन-तीन जणांनी मिळून त्याचा मोबाईल हिसकावला. एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आणि दुसऱ्याला नंतर अटक करण्यात आली.

पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीला पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, पोलिसांनी चोराला कसे पकडले आहे. त्यानंतर तो तिच्याकडून मोबाईल घेतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com