भयानक! आंध्र प्रदेशात कोणार्क एक्स्प्रेसने ६ जणांना चिरडले

विरुध्द दिशेला जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसने ६ जणांना चिरडले. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Train Accident News, Konark express News, Andhra Pradesh News, Konark express Accident News
Train Accident News, Konark express News, Andhra Pradesh News, Konark express Accident NewsSaam Tv

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा कोणार्क एक्स्प्रेसची धडक बसून सहा जणांचा मृत्यू झाला. गुवाहाटीकडे जाणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस काही तांत्रिक कारणामुळे थांबली होती, त्यावेळी काही प्रवासी रेल्वेमधून (Train) उतरून खाली रुळावर थांबले होते, तेव्हा विरुध्द दिशेला जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसने ६ जणांना चिरडले. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. (Andhra Pradesh News Updates)

गुवाहाटीकडे जाणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस पुढे असणाऱ्या बटुवा गावात तांत्रिक अडचण आल्यामुळे थांबली होती. यावेळी सुपरफास्ट एक्स्प्रेस मधील काही प्रवासी खाली उतरुन दुसऱ्या ट्रॅकवर म्हणजेच विरुध्द दिशेला जाणाऱ्या ट्रॅकवर थांबले होते. यावेळी कोणार्क एक्सप्रेसने आली, अचानक आलेल्या ट्रेनमुळे (Train) कोणाला काही कळेपर्यंत कोणार्क एक्सप्रेसने ६ जणांना चिरडले होते. यात चिरडलेल्या सहा जाणांची ओळख पटली आहे, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

Train Accident News, Konark express News, Andhra Pradesh News, Konark express Accident News
Buldhana: जलंब रेल्वे स्थानकावर आंदाेलकांनी राेखली महाराष्ट्र एक्सप्रेस

या अपघातात (Accident) जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तांत्रिक अडचण आल्यामुळे गुवाहाटीकडे जाणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस अचानक मध्येच थांबली होती. त्यामुळे या ट्रेनमधील प्रवासी खाली उतरुन थांबले होते.

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदतकार्य सुरू करण्याचे आणि जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com