Food Poisoning Death: पास्ता पुन्हा गरम करून खाल्ला; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

20-year-old man Death Food Poisoning: तरुणाला शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाने चांगलेच महागात पडले असून त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
20-year-old man Death Food Poisoning
20-year-old man Death Food PoisoningSaamtv

Food Poisoning News:

शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक असते. अनेकदा शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. एका २० वर्षीय तरुणालाही शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाने चांगलेच महागात पडले असून त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेवूया सविस्तर.

20-year-old man Death Food Poisoning
Kolhapur News : गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सभा, जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता; काय असतील विषय?

याबाबत अधिक माहिती अशी की, पाश्चिमात्य देशांमध्ये पास्ता सारखे फास्ट फूड प्रचंड लोकप्रिय आहेत. असेच फास्ट फूड खाणे एका २० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इटलीच्या ब्रुसेल्समध्ये टोमॅटो सॉससोबत पुन्हा गरम केलेले जेवण खाल्ल्याने एजे नावाच्या 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा पास्ता पाच दिवसांपूर्वी बनवला होता. जो मुलाने पुन्हा गरम करुन खाल्ला.

शाळेतून परतल्यावर एजेने मायक्रोवेव्हमध्ये गरम करून तो खाल्ला आणि खेळायला गेला. मात्र काही वेळाने त्याला अचानक मळमळ, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. 30 मिनिटांनी तो घरी पोहोचला आणि त्याला खूप उलट्या झाल्या. त्याला सतत जुलाब होत होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास तो झोपी गेला.

ही बाब रात्री आई-वडिलांना समजली आणि त्यांनी सकाळी 11 वाजता त्याची तपासणी केली असता त्यांचा मुलगा मृत झाल्याचे समजले. या प्रकाराने आई- वडिलांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, पास्ता खाल्ल्यानंतर 10 तासांनंतर म्हणजेच पहाटे 4 वाजता मुलाचा मृत्यू झाला.

''बॅसिलस सेरियस बॅक्टेरियामुळे झालेल्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलाला सेंट्रिलोब्युलर लिव्हर नेक्रोसिसचाही त्रास होता, त्यामुळे त्याच्या अवयवांनी काम करणे थांबवले होते. पास्ता बाहेर अनेक दिवस ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. विषाचे प्रमाण 14.8 μg/g झाले होते आणि मुलगा मरण पावला. (Latest Marathi News)

20-year-old man Death Food Poisoning
Mumbai Lake Water: मुंबईकरांसाठी खुशखबर! तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पाणीकपातीचं संकट टळणार?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com