Forbes Billionaires List 2023 : मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी किती आहेत मागे? जाणून घ्या

Mukesh Ambani : मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Forbes Billionaires List 2023
Forbes Billionaires List 2023Mukesh Ambani and Gautam Adani Net Worth

Asia's Richest Person: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. यातच मुकेश अंबानी यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी या यादीत 24 व्या क्रमांकावर घसरले आहेत. तत्पूर्वी गौतम अदानी 24 जानेवारी रोजी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी अदानी यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली.

आता किती आहे अदाणींची संपत्ती? (Gautam Adani Net Worth)

फोर्ब्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलर्स असून ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे. (Latest Marathi News)

Forbes Billionaires List 2023
Oneplus New Launch: 108MP कॅमेरासह OnePlus Nord CE 3 Lite लॉन्च, कमी किमतीत मिळणार दमदार फीचर्स

शिव नाडर तिसऱ्या स्थानावर (Shiv Nadar Net Worth)

फोर्ब्सच्या यादीनुसार, शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. तर सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla Net Worth) हे देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यातच स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमाणी आठव्या क्रमांकावर आहेत. (Mukesh Ambani Latest News)

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती 2,100 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2022 मध्ये हा आकडा 2,300 अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com