धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने संपवली जीवनयात्रा; राजकीय वर्तुळात खळबळ

माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या कन्या कंथामनेनी उमा माहेश्वरी यांची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह.
Daughter of NT Rama Rao News
Daughter of NT Rama Rao NewsSaam TV

हैदराबाद: तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (NT Rama Rao) यांच्या कन्या उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केली आहे. हैदराबादमधील (Hyderabad) जुबली हिल्स परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत कुटुंबीयांना आढळून आला आहे. स्थानिक पोलिसांनी माहेश्वरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी याप्रकरणी CRPCच्या कलम 174 नुसार गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

पाहा व्हिडीओ -

माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या कन्या उमा माहेश्वरी या आपल्याच घरात मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षांपासून त्या नैराश्य आणि आरोग्यासंबंधी समस्यांशी सामना करत असल्याचं बोललं जात आहे.

Daughter of NT Rama Rao News
Cyclist Meenakshi : क्रीडाप्रेमींचा काळजाचा ठोका चुकला; भारतीय सायकलपटू मिनाक्षीस अपघात (व्हिडिओ पाहा)

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. एनटी रामाराव यांना एकूण 12 मुलं होती या सर्व भावंडामध्ये उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. एनटी रामाराव तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि मुख्यमंत्री राहिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com