
नवी दिल्ली: तुम्ही आठवड्यातील किती दिवस काम करता? पाच किंवा सहा दिवस...? काही ठिकाणी तर आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागत आहे अशी स्थिती आहे. पण आठवड्याचे चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असेल तर? ब्रिटनमध्ये चार दिवसांचा आठवड्याचा प्रयोग केला जात आहे. बरं तीन दिवस सुट्टी असली तरी पगार मात्र संपूर्ण मिळणार आहे.
जगातील अनेक देशांत आठवड्यातील चार दिवस काम आणि तीन दिवसांची सुट्टी म्हणजे 'फोर डेज वीक' या फॉर्म्युल्याचा विचार केला जात आहे. तसा प्रयोगही सुरू झालेला आहे. आता ब्रिटनमध्येही फोर डेज वीकचा विचार सुरू झालेला आहे. तसा प्रयोग केला जात आहे. (Four Day Work Week)
विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या हजारो लोकांचा सहभाग यात असल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबरपर्यंत हा फॉर्म्युला राबवला जाईल. या सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता तपासून बघितली जाणार आहे.
जवळपास ७० कंपन्या या प्रयोगात सहभागी झाल्या आहेत. त्यात ऑक्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज विद्यापीठांतील स्टाफसह अमेरिकेच्या बोस्टन कॉलेजमधील तज्ज्ञांचा देखील समावेश आहे. संपूर्ण यूकेमधील, तसेच ३० हून अधिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ३३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन मिळेल. ८० टक्के वेळेत आधीची उत्पादनक्षमता १०० टक्के कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
जागतिक पातळीवर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांत ७ हजारांहून अधिक कर्मचारी आणि दीडशे कंपन्यांनी ४ डे वर्कवीकच्या या सहा महिन्यांसाठीच्या प्रयोगात सहभागी होण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.