
वृत्तसंस्था: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बुधवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे मित्र फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. पीएम मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री होती आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पंतप्रधान मोदींचा हा फ्रान्स दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिका (America) आणि इतर पाश्चात्य देश रशियाबाबत भारतावर दबाव आणत आहेत. अशा परिस्थितीत भारत (India) आपल्या मित्र फ्रान्सच्या दिशेने वेगाने पुढे जाऊ शकतो. भारताला राफेल, मिराज आणि कलवरी पाणबुडी यांसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने पुरवणाऱ्या फ्रान्सचे भारतासाठी 'नवे रशिया' असे वर्णन करत आहेत. PM मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आणि फ्रान्स यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली आहे.
फ्रान्समध्ये मॅक्रॉन सत्तेवर परतल्यानंतर, पंतप्रधान मोदी हे काही परदेशी नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. फ्रान्स आता भारतासाठी 'नवा रशिया' बनत असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजही रशियन शस्त्रांवर अवलंबून असलेल्या भारताला फ्रान्सपासून अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांपासून ते पाणबुडीपर्यंत सर्व काही मिळत आहे. फ्रान्सच्या मिराज-२००० विमानाने पाकिस्तानात घुसून बालाकोट हवाई हल्ला केला होता. एवढेच नाही तर आता हिंदी महासागरात चायना ड्रॅगनच्या वाढत्या घुसखोरीवर भारत आणि फ्रान्स एकत्र लढणार आहेत.
हे देखील पाहा-
अणुस्फोटावरून पोखरण चिघळले होते, रशिया, फ्रान्सने खेळली दोस्ती
१९९८ साली भारताने पोखरणमध्ये अणुबॉम्बची चाचणी केली, तेव्हा फ्रान्स हा एकमेव शक्तिशाली देश होता. ज्याने नवी दिल्लीवर टीका केली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. अमेरिका आणि ब्रिटनने निर्बंध लादले होते. भारताचा अविभाज्य मित्र असलेल्या रशियानेही अणुचाचण्यांमुळे फार नाराजी व्यक्त केली आणि आधी का सांगितले नाही, असा सवाल केला होता. दुसरीकडे फ्रान्सने भारताला उघडपणे पाठिंबा दिला. ब्रिटननंतर फ्रान्स हा एकमेव देश आहे ज्याच्या १९७६, १९८०, १९९८, २००८ आणि २०१६ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रप्रमुखाला आमंत्रित करण्यात आले होते.
२००८ मध्ये आण्विक पुरवठादार देशांच्या गटाने आण्विक व्यापाराला परवानगी दिल्यानंतर भारताला अणुभट्ट्या विकण्याच्या करारावर स्वाक्षरी करणारा फ्रान्स हा रशियानंतरचा दुसरा देश होता. यामुळेच २०१६ मध्ये पीएम मोदी म्हणाले होते की भारत आणि फ्रान्स एकमेकांसाठी बनलेले आहेत. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर फ्रान्ससोबतचे संबंध अधिक घट्ट झाले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये, भारताने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला भेट दिली. यादरम्यान मॅक्रॉन यांनी काश्मीरबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. तेव्हा फ्रान्सने भारताला पाकिस्तानविरोधात उघडपणे पाठिंबा दिला . याशिवाय सुरक्षा परिषदेत पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरविरोधात आणलेल्या ठरावाला आणि पाकिस्तानविरोधातील FATF च्या प्रस्तावाला फ्रान्सने पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताचा फ्रान्सवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच आता फ्रान्सला भारताचा 'नवा रशिया' म्हणू लागले आहेत. रशियाबाबत भारत पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर असताना मॅक्रॉन भारताला खूप मदत करू शकतात. मॅक्रॉन आणि पुतीन यांचे खूप जवळचे संबंध आहेत. युक्रेनबाबत मॅक्रॉन यांनी मॉस्कोलाही भेट दिली. इंदिरा गांधींनी संरक्षण संबंध सुरू केले आहे.
१९८० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोव्हिएत युनियनकडून शस्त्रास्त्रांच्या आयातीवर भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी फ्रान्सकडे मोर्चा वळवला होता. यानंतर भारत आणि फ्रान्सचे संरक्षण संबंध खूप मजबूत झाले आहेत, जे समुद्रापासून हवेपर्यंत सुरू आहेत. फ्रान्सच्या सहकार्याने भारतात शस्त्रे बनवण्याचा उद्योग वाढवण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपण स्वावलंबी होऊ शकणार आहोत. ऑस्ट्रेलियासोबतचा अणुकरार रद्द केल्यानंतर आता फ्रान्स भारताला आण्विक पाणबुडी देऊ शकतो, असे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनला लगाम घालण्यासाठी भारताला याची मोठी मदत होऊ शकणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.