मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार

केंद्र सरकार यापुढे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढे नेणार नाही.
मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार
मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणारSaam Tv

वृत्तसंस्था : केंद्र सरकार यापुढे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढे नेणार नाही. कोरोना काळामध्ये गरिबांनी उपाशीपोटी झोपू नये, याकरिता सुरू केलेली गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोफत रेशन वितरणाचा कालावधी हा नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही.

हे देखील पहा-

माध्यमांशी बोलताना अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार की अर्थव्यवस्था सुधारत आहे. यामुळे ओएमएसएस ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत अन्नधान्याची मागणी देखील वाढली आहे. यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन वितरणाचा कालावधी वाढवण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता सरकारने लॉकडाऊन दरम्यान मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY सुरू करण्यात आली आहे. यावर्षी एप्रिल- मे मध्ये ही योजना परत एकदा सुरू करण्यात आली आहे. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावलीपर्यंत म्हणजेच ३० नोव्हेंबरपर्यंत PMGKAY सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती.

मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार
‘जय भीम’ चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्मात्यांना नोटीस

PMGKAY अंतर्गत, अन्न सुरक्षा हमी योजना NFSA अंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांना प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य गहू- तांदूळ मोफत देण्यात आले आहे. हे NFSA अंतर्गत उपलब्ध प्रति सदस्य ५ किलो धान्य गहू किंवा तांदूळ व्यतिरिक्त होते. सरकारच्या या योजनेमुळे कोरोनामध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com