देशात इंधन दरवाढीचा भडका कायम, पाहा पेट्रोल किती रुपयांनी महागलयं!

देशात इंधन भाववाढीचा आलेख काय खाली येण्याची चिन्हे दिसत नाहीत
देशात इंधन दरवाढीचा भडका कायम, पाहा पेट्रोल किती रुपयांनी महागलयं!
देशात इंधन दरवाढीचा भडका कायम, पाहा पेट्रोल किती रुपयांनी महागलयं!Saam Tv

वृत्तसंस्था : देशात इंधन भाववाढीचा आलेख काय खाली येण्याची चिन्हे दिसत नाहीत. ऑक्टोबरमध्ये सातत्याने पेट्रोल डिझेलच्या भाव हे वाढतच आहेत. रविवारी परत एकदा सरकारी तेल कंपन्यांनी इंधन तेलाच्या भावामध्ये वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे भाव प्रत्येकी ३५ पैसे प्रति लिटर इतके वाढले आहे. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत.

पहा व्हिडिओ-

यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०७.५९ रुपये झाले आहे. तर डिझेलचा भाव ९६.३२ रुपये इतका झाला आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल ११३.४६ रुपये असून डिझेल १०४.३८ रुपये इतक्या भावाने विक्री केलं जात आहे.

देशात इंधन दरवाढीचा भडका कायम, पाहा पेट्रोल किती रुपयांनी महागलयं!
महमूद अली यांची बहिण बॉलिवूड अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन

मागील दीड वर्षात पेट्रोलच्या भावात ३६ रुपयांची तर डिझेलच्या भावात २७ रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने मे २०२० मध्ये उत्पादन शुल्कात वाढ केल्यानंतर पेट्रोल आतापर्यंत ३५ रुपये ९८ पैसे वाढले आहे. तर डिझेलच्या भावात २६ रुपये ५८ पैशांची वाढ झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com