पेट्रोल-डिझेलच्या भडक्यानं नागरिकांच्या बजेटला आग; आज पुन्हा इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ

देशात पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले
पेट्रोल-डिझेलच्या भडक्यानं नागरिकांच्या बजेटला आग; आज पुन्हा इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ
Petrol-Diesel Price Saam Tv

वृत्तसंस्था: अगोदरच महागाईने सर्वसामान्य लोकांचे बेहाल करून टाकले आहेत. यातच देशात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल (Petrol Price)-डिझेलचे (Diesle Price) आजचे नवे भाव जारी केले आहेत. आज देखील पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जवळ (Petrol) पास १ महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Diesel) भावात स्थिर आहेत.

याअगोदर ६ एप्रिल दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन भावानुसार, राष्ट्रीय राजधानीमध्ये १ लिटर पेट्रोलचे भाव (Petrol Price) १०५.४१ रुपये आहे. डिझेलचे (Diesel Price) ९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलसाठी १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत.

हे देखील पाहा-

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या भावानुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोलचे १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा भाववाढ केली होती.

मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Petrol-Diesel Price
एअरटेलने यूजर्सना दिली खूशखबर! ‘या’ प्लॅनमध्ये Netflix पूर्णपणे मोफत

देशातील महत्त्वाच्या शहरातील भाव काय?

शहरं पेट्रोलच्या भाव (प्रति लिटर) डिझेलच्या भाव (प्रति लिटर)

मुंबई 120.51 104.77

दिल्ली 105.41 96.67

चेन्नई 110.85 100.94

कोलकाता 115.12 99.83

हैद्राबाद 119.49 105.49

कोलकाता 115.12 96.83

बंगळुरू 111.09 94.79

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.