Paytm वर फ्रीमध्ये मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Paytm ने आपल्या ग्राहकांसाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे.
Paytm वर फ्रीमध्ये मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया
CylinderSaam Tv

नवी दिल्ली : पेटीएमवर (Paytm) एलपीजी गॅस सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार असल्याची घोषणा पेटीएमने केली आहे. पेटीएमने ही योजना नव्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. त्यामुळे आता पेटीएम वापरुन फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळण्याची संधी आहे. जर तुम्ही पेटीएमचे नवे ग्राहक असाल तर तुम्हाला गॅस सिलेंडर (Gas) बुक करण्यासाठी अतिरीक्त लाभ देणार आहे.

पेटीएमचे अनेक वापरकर्ते अगोदरपासूनचं गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंगची सेवेचा वापर करत आहेत. गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंगची सेवा फक्त पेटीएमवर उपलब्ध आहे. (Free LPG Cylinder)

Cylinder
महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

फ्री सिलेंडरसाठी करावं लागणार हे काम

पेटीएमच्या सर्व ग्राहकांना फ्रीमध्ये सिलेंडर मिळवण्याची संधी आहे. पेटीएम अॅपवर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी वापरर्त्यांना अगोदर फक्त Freegas कूपन कोड वापरण्याची आवश्यकता आहे.

या व्यतिरीक्त पेटीएमचे नवे वापरकर्ते पहिल्या व्यवहारासोबत त्यांची पहिली बुकिंगवर ३० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएम अॅपवर पेमेंट करताना त्यांना फक्त प्रोमो कोड "FIRSTCYLINDER" वापरावा लागेल. ही कॅशबॅक ऑफर इंडेन, HP गॅस आणि भारत गॅस या तीनही LPG सिलिंडर कंपन्यांवर वैध आहे . एवढेच नाही तर पेटीएम पोस्टपेड या नावाने प्रसिद्ध असलेल्या पेटीएम नाऊ पे लेटर सेवेमध्ये नोंदणी करून तुम्ही पुढील महिन्यात सिलिंडर बुकिंगसाठी पैसे देऊ शकाल.

Cylinder
अजबच ! चोरट्याने चक्क गॅस सिलिंडरवर मारला डल्ला, पोलीसही झाले थक्क 

असं करु शकता बुकिंग

कंपनीने एलपीजी सिलेंडर (Gas) बुकिंगच्या सेवेत बदल केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गॅस सिलेंडरचे डिटेल्स घेता येतो आणि रिफिलसाठी अॅटोमॅटीक रिमाइंडर मिळू शकतात. पेटीएमवरुन सिलेंडर जलद बुकिंग करणे सोपे झाले आहे. तुम्ही या स्टेप्स फॉलो करून गॅस सिलेंडर बुक करू शकता.

सर्वप्रथम तुमच्या फोनवर तुमचे पेटीएम अॅप उघडा. नंतर रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाच्या अंतर्गत 'बुक गॅस सिलेंडर' टॅबवर जा. हे तुम्हाला गॅस डिलीव्हारी करणाऱ्याचे पर्याय देईल यावर क्लिक करा. त्यानंतर, तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक त्यात टाका. पेमेंट करण्याची प्रोसेस येईल. पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यासारख्या तुम्हाला हव्या असेल्या पर्यायाला क्लिक करा, त्यावरुन पैसे द्या. कूपन कोड विभागात प्रोमो कोड 'FREEGAS' यावर क्लिक करा. पेमेंट पूर्ण करा यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीद्वारे नोंदणीकृत पत्त्यावर गॅस सिलेंडर मिळेल.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.