
Gautam Adani Wealth: उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुरु असलेली घसरण कमी होताना दिसत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी 22व्या स्थानावर पोहोचले आहे. अदानी समूहाने स्वप्नातही विचार केला नसेल इतक्या वेगाने त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टने अदानी समूहाला सुमारे 108 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे..
हिंडेनबर्गने एक रिपोर्ट जारी करत अदानी समूहावर अनेक गंभार आरोप केले होते. या आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एकत्रितपणे सुमारे 47 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे अदानी समूहाला आतापर्यंत 108 अब्ज डॉलर म्हणजेच 8.877 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मनी लाँड्रिंग, अनधिकृत ट्रेडिंग, आर्थिक अनियमितता, मोठी कर्जे असे अनेक गंभीर आरोप हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आले होते. कोणत्याही कंपनीसाठी असे आरोप घातक ठरु शकतात. हिंडेनबर्गने केलेले आरोप खोटे असल्याचे अदानी समूहाने म्हटलं. भारत आणि तेथील कंपन्यांवर आणि देशाच्या विकासावर नियोजित हल्ला असल्याचे कंपनीने म्हटले होते.
मुकेश अंबानी देखील टॉप 10 मधून बाहेर
Forbe Billionairesनुसार अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 22व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती आता 57.7 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या २४ तासांत अदानी समूहाला 18.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी 11व्या स्थाानावर आहेत.त्यांची संपत्ती 82.4 अब्ज डॉलवर आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.