जर्मनीत व्हॅक्सिन सर्टीफिकेट दाखवले अन् मोदींचा फोटो पाहून अधिकारी हसले

लंडनला जाताना जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर दीप्ती नावाच्या भारतीय महिलेच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो पाहून अधिकारी अगोदर संतापले नंतर खळखळून हसले.
जर्मनीत व्हॅक्सिन सर्टीफिकेट दाखवले अन् मोदींचा फोटो पाहून अधिकारी हसले
जर्मनीत व्हॅक्सिन सर्टीफिकेट दाखवले अन् मोदींचा फोटो पाहून अधिकारी हसलेSaam Tv News

भारतात कोरोनाची लस घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र दिले जाते त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असतो. लसीकरणच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असावा की नसावा यावर मोठा गदारोळ सुरु आहे. मात्र दीप्ती ताम्हणे नावाच्या भारतीय महिलेला एक वेगळाच अनुभव आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपल्या मैत्रिणीसोबत घडलेला हा किस्सा फेसबुकवर सांगितला आहे. german airport security officer laugh to watch modi's photo on corona vaccine certificate

लंडनला जाताना दिप्ती नावाच्या भारतीय महिला फ्रँकफर्ट एअरपोर्टवर पोहोचल्या. तेव्हा तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिप्ती यांच्याकडे कोरोना लसी घेतली असल्याचे प्रमाणपत्र मागितले. दिप्ती यांनी स्वतःचे लसीकरण प्रमाणपत्र संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. मात्र हे प्रमाणपत्र पाहुन ते अधिकारी गोंधळले.

प्रमाणपत्रावर दिप्ती यांचा फोटो नसून कुण्या दुसऱ्याच व्यक्तीच्या लसीकरणाचे हे प्रमाणपत्र असावे, असं त्या सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटलं. त्यामुळे ते अधिकारी दिप्ती यांना म्हणाले की, ''अहो तुमचे सर्टिफिकेट द्या हे कुणाचे तरी दुसऱ्याचेच आहे.'' मात्र दिप्ती यांनी त्या सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं की, हे लसीकरणाचे सर्टिफिकेट माझेच असून यावरील फोटो हा आमच्या पंतप्रधानांचा आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याने आपल्या सहकार्याला मोदींचा फोटो असलेले प्रमाणपत्र दाखवले आणि दोघेही खळखळून हसू लागले. असं दिप्ती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com