WhatsApp New Scam : सावधान ! तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपच्या +84, +62, +60 या नंबरवरुन कॉल येतोय ? जाणून घ्या यामागचे सत्य

International Phone Number Scam : तुम्हाला देखील व्हॉट्सअ‍ॅपवरुन +84, +62, +60 वरुन कॉल येत असतील तर या नंबरवरुन कॉल सतत येत असतील तर हे कॉल उचलून नका.
WhatsApp New Scam
WhatsApp New ScamSaam Tv

How To Block WhatsApp Number : जगभरातील ९० टक्के लोक हे व्हाट्सएप फोनमध्ये वापरतात. मेटाने तयार केलेले इंस्‍टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर सतत नवनवीन अपडेट येत राहतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जगभरातील लाखो वापरकर्ते चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी आता व्हॉट्सअ‍ॅपने अपडेट केल आहे.

हल्ली व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) वापरकर्त्यांसाठी अनेक नवेनवे अपडेट केले आहे ज्यामुळे स्पॅम कॉल ब्लॉक करता येऊ शकतो. नोट रेकॉर्डिंग यांसारखे अनेक अपडेट व्हॉट्सअ‍ॅपने आणले आहे. अशातच तुम्हाला देखील व्हॉट्सअ‍ॅपवरुन +84, +62, +60 वरुन कॉल येत असतील तर या नंबरवरुन कॉल सतत येत असतील तर हे कॉल उचलून नका. या नंबरला ब्लॉक करा.

WhatsApp New Scam
WhatsApp Secret Features : व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या सिक्रेटपासून राहा सावध! नाहीतर, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

तंत्रज्ञानाच्या या जगात अनेक प्रकारचे वेगवेगळे स्कॅम केले जात आहे ज्यासाठी हल्ली स्कॅम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा नवा सापळा रचला जात आहे. याआधी देखील व्हॉट्सअ‍ॅपवरुन अनेक प्रकारचे स्कॅम करण्यात आले होते. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर अनेक स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी (Fraud) आणि त्यांचे अकाउंट खाली करण्यासाठी केला आहे. याचे कारण म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे.

1. आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉलिंग

अनेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे की, त्यांना मलेशिया, केनिया आणि व्हिएतनाम, इथिओपियासारख्या देशांमधून कॉल येत आहेत. परंतु हे कॉल येण्यामागचे कारण अद्यापह स्पष्ट झालेले नाही. मेटाने (Meta) सांगितले आहे की, हा स्कॅम करण्याचा नवा प्रकार असू शकतो त्यासाठी वापरकर्त्यांनी यानंबरवरुन येणाऱ्या कॉलला उचलू नये. तसेच काही लोक नवीन सिम विकत घेत असल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अधिक कॉल येत आहेत.

WhatsApp New Scam
WhatsApp New Features : व्हॉट्सअॅपच आल नव फीचर्स ! आता पर्सनल चॅटला करता येणार लॉक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

2. यासाठी काय कराल ?

तुम्हाला या नंबरवरुन कॉल आल्यावर तुम्ही त्याला ब्लॉक लिस्टमध्ये टाका. तसेच अज्ञात कॉलवरुन आलेला कॉल, मेसेज किंवा लिंकवर क्लिक करु नका. यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तसेच तुमच्या फोनमधील इतर महत्त्वाच्या गोष्टी चोरल्या जाऊ शकतात. त्यासाठी वापरकर्त्यांनी अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉलपासून सावध राहायला हवे.

3. या नंबरला ब्लॉक कसे कराल ?

  • तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.

  • अधिक पर्यायांवर टॅप करा आणि सेटिंग्जवर टॅप करा.

  • त्यानंतर गोपनीयता > अवरोधित संपर्क वर टॅप करा.

  • नंबर ब्लॉक करण्यासाठी फक्त ब्लॉक बटणांवर टॅप करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com