Car Fire: हृदयद्रावक! कारने अचानक पेट घेतला; आई-वडिलांसमोरच चिमुकलीचा मृत्यू

Accident News : कारचा दरवाजा जाम झाल्याने आई-वडिलांसमोरच चिमुकलीचा कारमध्ये अडकून मृत्यू झाला.
Punjab news
Punjab news Saam TV

Punjab News: कारमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीत (Car Fire) चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आग एवढी भीषण होती की संपूर्ण कार जळून खाक झाली.

कारचा दरवाजा जाम झाल्याने चिमुकली कारमध्ये अडकली. तरनवीर असं या चिमुकलीचं नाव आहे. अनेक जण यावेळी मदतीला धावून आले मात्र मुलीला वाचवता आले नाही.

Punjab news
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह लहानग्याचा मृत्यू, दोघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, फरीदकोट जिल्ह्यातील कालेर कलान गावातील रहिवासी गुरजीत सिंह पत्नी, तीन मुली आणि एका मुलासह स्विफ्ट कारमधून धर्मकोटला जात होते.दरम्यान कारमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. (Latest News)

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. आग लागल्यानंतर सर्वजण पटापट गाडीतून बाहेर पडले. मात्र दरवाज लॉक झाल्याने समोरच्या सीटवर बसलेल्या तरनवीरला बाहेर काढता आले नाही.

Punjab news
Dombivli News: डोंबिवलीत फुगे फेकण्यावरून दोन गटात राडा, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

घटनेची माहिती मिळताच तलवंडी भाईचे एसएचओ शिमला आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने आग विझवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र आग विझेपर्यंत मुलीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात आणि कालेर कलान गावात शोककळा पसरली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com