लग्नाच्या ७ दिवसाआधीच तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; कारण ऐकून सगळेच अवाक
Uttar Pradesh CrimeSaam Tv

लग्नाच्या ७ दिवसाआधीच तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; कारण ऐकून सगळेच अवाक

Uttar Pradesh Crime : लग्नाला अवघे 7 दिवस उरले असताना तरुणीने आपल्या प्रियकरासह मालगाडीसमोर उडी घेत आत्महत्या केली.

टिकमगड: मुलाला मुलगी पसंत झाली लग्नाची तारीखही ठरली. पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी पत्रिकाही छापल्या. लाडक्या लेकीचं लग्न (Marriage) होणार म्हणून घरातील सर्व मंडळी तयारी व्यस्त होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. लग्न घरात आनंदाचं वातावरण असताना अचानक मुलीने आत्महत्या केल्याची खबर मिळाली. अन् क्षणार्धात कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. धुमधडाक्यात लग्न लावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडलं. लग्नाला अवघे 7 दिवस उरले असताना तरुणीने आपल्या प्रियकरासह मालगाडीसमोर उडी घेत आत्महत्या केली. (Uttar Pradesh Latest Crime News)

Uttar Pradesh Crime
दिल्ली दुहेरी हत्याकांडाने हादरली; खुल्या परिसरात गोळीबार

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) टिकमगड जिल्ह्यातील मऊचुंगी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 7 दिवसांवर लग्न येऊन ठेपलं असताना एका तरुणीने आपल्या प्रियकरासह मालगाडीसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मऊचुंगी येथील एका तरुणीचं विवाह टिकमगड जिल्ह्यातील एका तरुणासोबत होणार होता. 14 मे विवाहाची तारीखही ठरली होती. मात्र तरुणीचं बांद्री येथील राहणाऱ्या एका तरुणाशी सूत जुळलं होतं. दोघांनाही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं. मात्र, असं असूनही दोघांच्याही कुटुंबियांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता.

अखेर कुटुंबियांच्या विरोधाला तसेच एकमेकांपासून दूर होण्याच्या भीतीने दोघांनीही शनिवारी 6 वाजेच्या सुमारास मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी हा आत्महत्यचे थरार त्यांच्या डोळ्यांनी बघितला. काहींनी या जोडप्याला रोखण्याचाही प्रयत्न केला मात्र मालगाडी जवळ येताच नागरिक दूर पळाले. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांनी याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले.

Uttar Pradesh Crime
पाणीपुरी घेऊन घरी पोहोचला पती; तेव्हा 'बाथरूम'मध्ये आढळला पत्नीचा मृतदेह

त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबियांना दिली. जेव्हा ही माहिती कुटुंबियांना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाला अवघे 7 दिवस शिल्लक असताना आपल्या लाडक्या लेकींनं आत्महत्या केल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे मृत तरुणाच्या घरी ही बातमी कळताच मोठा आक्रोश झाला. दोघांच्याही नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत आरडाओरड सुरू केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.