शौचाला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपी गजाआड

रुडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.
rape case
rape casesaam tv

बस्ती : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बस्ती जिल्ह्यातील रुडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तरुणी सौचास गेली असता तीन नराधमांनी तिच्यावर (Gang Rape) सामुहिक बलात्कार केला. पीडित तरुणी घरी पोहोचल्यावर घडलेली गंभीर घटना पीडितेने कुटुंबियांना सांगितली.त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी (Three culprit arrested) तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

rape case
अखेर न्याय झाला! ग्रीष्मा वेकारियाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडित तरुणी शौचास जाण्यासाठी घराबाहेर पडली होती.त्यावेळी गावातील तीन तरुणांनी तिच्यावर अतिप्रसंग केला.तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिघेही फरार झाले.त्यानंतर पीडित तरुणी घरी पोहोचल्यावर झालेला सर्व प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला.त्यानंतर बुधवारी रात्री या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांना कळवण्यात आलं.

पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेची माहिती मिळताच बस्तीचे पोलीस अधिक्षक आशिष श्रीवास्तव तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सीक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले."या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेतली.पीडितेलाही रुग्णालयात दाखल केलं." अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com