बॉयफ्रेंडसाठी काय पण! प्रेयसी बांगलादेशच्या नदीतून पोहत थेट भारतात, त्यानंतर...

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण खऱ्या प्रेमात आंधळेपणा नसतो, कारण...
Love Affair latest news update
Love Affair latest news updatesaam tv

कोलकता : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण खऱ्या प्रेमात (True Love) आंधळेपणा नसतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्रेमासाठी एका तरुणीने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी सातासमुद्रापलीकडचा प्रवास केला आहे. तुम्हाला कदाचीत विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. एका प्रेयसीने तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी चक्क बांगलादेशच्या (Bangladesh) नदीतून पोहून बेकायदेशीरपणे भारतात (India) येण्याचा पराक्रम केलाय.

Love Affair latest news update
केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिळालेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय तरुणीने बांगलादेशच्या नदीतून पोहत भारताची सीमा ओलांडली. क्रिष्णा मंडल असं त्या तरुणीचं नाव आहे. आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी क्रिष्णाने ठाम निर्धार करत बेकायदेशीरपणे बांगलादेशच्या नदीतून भारतात येण्याचा पराक्रम केला. क्रिष्णा अभिक मंडल नावाच्या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर क्रिष्णा अभिकच्या प्रेमात पडली. परंतु, क्रिष्णाकडे पासपोर्ट नसल्याने अभिकला भेटता येत नव्हतं. त्यामुळे तिने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिष्णाने पहिल्यांदा सुंदरबनमध्ये प्रवेश केला. हे क्षेत्र रॉयल बेंगाल टायगर्स नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्रिष्णा डेस्टीनेशनवर पोहोचण्यासाठी जवळपास एक तास नदीच्या प्रवाहातून पोहली.

Love Affair latest news update
मुंबईत आज कोरोनाचा विस्फोट; आजचा रिपोर्ट धडकी भरवणारा

कोलकताच्या कालीघाट मंदीरात क्रिष्णाने तीन दिवासांपूर्वी अभिकसोबत लग्न केलं. परंतु बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याने सोमवारी क्रिष्णाला अटक करण्यात आली. दरम्यान, क्रिष्णाला बांगलादेशच्या हाय कमिशनकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यापूर्वीही एका बांगलादेशी तरुणाने भारतात चॉकलेट खरेदी करण्यासाठी नदीतून पोहून भारतात प्रवेश केला होता.इमान होसेन असं त्या तरुणाचं नाव आहे. बेकायदेशीरपणे इमानने भारतात प्रवेश केल्याने त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com