प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी प्रेयसीने टाकला दरोडा, आता दोघांनाही जेलची हवा!

तामिळनाडूच्या कालियाम्मल भागात दुचाकीवरून आलेल्या दोन बीटेक विद्यार्थ्यांनी एका वृद्ध महिलेला लुटले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी प्रेयसीने टाकला दरोडा, आता दोघांनाही जेलची हवा!
Crime NewsSaamTV

तामिळनाडू: थोंडामुथूर येथे एका वृद्ध महिलेला लुटणाऱ्या इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार, कालीअम्मल परिसरात एक महिला रस्त्यावर शेळ्या चरत असताना दोन दुचाकीस्वार तिच्याजवळ थांबले. दोघांनी महिलेला पत्ता विचारण्याच नाटक केल. महिलेने पत्ता सांगण्यास सुरुवात करताच संधीचा फायदा घेत दुचाकीस्वारांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पलायन केले. यानंतर, पीडित महिलेने तत्काळ पोलिसांत तक्रार दिली आणि सांगितले की, दोन आरोपींनी तिची 44 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले ज्याद्वारे आरोपींची ओळख पटली.

Crime News
राज, राणे आणि राणा म्हणजे 'RRR' चित्रपट; राज्यातील राजकारणावर भुजबळांची प्रतिक्रिया

वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून (Registration Number) आरोपींचा शोध घेण्यात आला आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आरोपींची नावे 20 वर्षीय प्रसाद आणि तेजस्विनी अशी आहे. दोघेही सोमय्यापालयम येथील एका खासगी महाविद्यालयात बी.टेक तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.

तर, दोन्ही आरोपी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही चांगल्या घरचे आहेत असेही पोलिसांनी सांगितले. मात्र प्रसादला ऑनलाइन जुगाराचे वाईट व्यसन असल्याने त्याने खूप कर्ज घेतले असून ते फेडण्यासाठी दोघांनी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडवून आणण्यास सुरुवात केली अशी, महिती पोलीस तपासात समोर आली.

हे देखील पहा-

पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रसादच्या कुटुंबीयांनीही एकदा घरातून 250 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र ही चोरी आपल्याच मुलाने केल्याचे समजताच त्यांनी केस मागे घेतली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.