धक्कादायक! प्रियकराने दिला धोका, प्रेयसीने त्याच्या वडिलांशीच केलं लग्न

प्रियकराने धोका दिल्यानंतर प्रेयसीने त्याच्या वडिलांसोबतच लग्नगाठ बांधली.
Marriage
MarriageSaam TV

वॉशिंग्टन : आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या प्रेमकथा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण ही अनोखी प्रेमकहाणी वाचून तुम्ही सुद्धा तोंडात बोटं घालाल. सध्या सोशल मीडियावर एका व्हायरल होणाऱ्या तरुणीच्या प्रेमकथेनं सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे. या तरुणीचं एका तरुणावर प्रेम जडलं. दोघेही अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसानंतर तरुणाने तिला धोका दिला. त्यानंतर संतापलेल्या तरुणीने चक्क तरुणाच्या वडिलांसोबतच लग्न केलं. (Girlfriend Married To boyfriend's Father)

Marriage
अरे बापरे! नशेसाठी तरुणांकडून चक्क कंडोमचा वापर; धक्कादायक कारण उघड

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही प्रेमकथा अमेरिकेतल्या हॉस्टन शहरात घडली आहे. या तरुणीने आपली प्रेमकथा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली आहे. ही तरुणी एका तरुणाच्या प्रेमात होती. काही दिवस ते रिलेशनशिपमध्येही राहिले. पण, तिच्या बॉयफ्रेंडने तिची एकदा नव्हे तर दोनदा फसवणूक केली.

ऑगस्टा हबल असे या तरुणीचे नाव असून ती अमेरिकेतल्या हॉस्टन शहरातील आहे. हबलने व्हिडिओतून सांगितलं की, ती 21 वर्षांची असताना तिचे 30 वर्षीय तरुणासोबत प्रेम जुळलं होतं.ऑगस्टाच्या माहितीनुसार, तिचा प्रियकर अगदी तिच्या स्वप्नातील राजकुमारसारखा होता. तो तिला नेहमी खूश ठेवायचा. दररोज तिच्यासाठी फुलं आणायचा, भेटवस्तू द्यायचा आणि लग्नाबाबत विचारणाही करायचा.

Marriage
नांदेड हादरलं! महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला; त्यानंतर घडलं भयंकर

हबल पुढे सांगते की, 2 वर्षांच्या त्यांच्या प्रेमसंबंधात सर्व काही ठीक होते. पण नंतर तिला कळाले की, तिचा प्रियकर तिची फसवणूक करत आहे. हबलचा प्रियकर तिच्या मैत्रिणीच्या देखील संपर्कात होता. हबलला न कळता दोघेही भेटायचे. जेव्हा ही गोष्ट हबलला कळाली तेव्हा तिने प्रियकराला जाब विचारला. प्रियकरानेही आपले मैत्रिणीसोबत प्रेमसंबध असल्याची कबूली दिली आणि पुन्हा असं करणार नाही असं वचन दिलं.

दरम्यान, हबलने तिच्या प्रियकराला आणखी एक संधी दिली. मात्र, तरीही त्याने आपले कारनामे सुरूच ठेवले. दोनदा फसवणूक केल्यानंतर तरुणीने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले. यानंतर त्याच्याच वडिलांना पसंत करत त्यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हबल सांगते की, तिने प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्याच वडीलांशी लग्न केलं. नुकताच तिने आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवसही साजरा केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com