कोविशील्डचा दुसरा डोस 28 दिवसांनंतरच द्या; केरळ उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

केरळ उच्च न्यायालयाने लसीकरणासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. कोविशील्डचा दुसरा डोस 28 दिवसांनंतरच द्या असे केंद्र सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.
कोविशील्डचा दुसरा डोस 28 दिवसांनंतरच द्या; केरळ उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
कोविशील्डचा दुसरा डोस 28 दिवसांनंतरच द्या; केरळ उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देशSaam Tv News

नवी दिल्ली: केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) लसीकरणासंदर्भात (Vaccination) एक मोठा निर्णय दिला आहे. कोविशील्डचा (Covishield) दुसरा डोस २८ दिवसांनंतरच द्या असे केंद्र सरकारला (Central Government) निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेत महत्त्वपूर्ण हस्तक्षेप करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, खाजगी क्षेत्रात कोविडशील्डचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दिला जाऊ शकतो. परंतु ही मुदत सरकारद्वारे मोफत पुरवल्या जाणाऱ्या लसींवर लागू होणार नाही. (Give a second dose of Covishield only after 28 days; Kerala High Court directs Central Government)

जर परदेशात जाणाऱ्यांना ८४ दिवसांच्या आत डोस दिला जात आहे, तर रोजगारासाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी का नाही? असा सवाल कोर्टाने केंद्राला केला. केंद्र सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर दिला जात आहे.

कोविशील्डचा दुसरा डोस 28 दिवसांनंतरच द्या; केरळ उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी राज्यात लागू शकतात निर्बंध

मात्र आता केरळ उच्च न्यायालयाने ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांमध्ये लसीचा दुसरा डोस देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता २८ दिवसांमध्येच लसीकरण पुर्ण होऊ शकेल. मात्र या आदेशाची अंमलबजावणी कधी होते हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com