
नवी दिल्ली - नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Price) कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे. आठवड्यातच त्याच्या किंमतींमध्ये बरेच बदल झाले आहेत.
यासह सोन्याने आता 51 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात वाढ झाली होती जी आठवडाभर दिसून आली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 51 हजार रुपयांच्या खाली होता, तर त्याची किंमत 50 हजार रुपयांच्या वर होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव चढेच राहिले आहेत. सोन्याचे दर आता पुन्हा तेजीत आहेत.
हे देखील पाहा -
देशांतर्गत बाजारात, एमसीएक्सवर(MCX), या आठवड्यात सोन्यामध्ये 1.54 टक्क्यांची उसळी नोंदवली गेली असून सोन्याचे दर 51,426 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. गेल्या आठवड्यात हाच दर 50,644 रुपयांवर बंद झाला होता .अशाप्रकारे, साप्ताहिक आधारावर सोन्याच्या दरात 782 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
चांदीच्या दरात वाढ
चांदीच्या दरामध्ये , स्थानिक बाजारातील एमसीएक्सवर(MCX), चांदी (Silver Price Today) साप्ताहिक आधारावर 5.88 टक्क्यांनी वाढून 58,370 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तीन आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 9.47 टक्क्यांच्या वाढीसह 20.32 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. गेल्या पाच आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.
सोन्याची शुद्धता अशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. (How To Check Gold Purity In India)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.