Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price : २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५८ हजार ८४० रुपये इतका आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam tv

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काल १६ मार्च रोजी सोन्याने जोरदार मुसंडी मारली. तब्बल ५०० रुपयांनी सोन्याचे दर वाढले. तर आज देखील सोन्याच्या दरात वाढ झाल्याच पहायला मिळत आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ५३ हजार ९५० इतके आहेत. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५८ हजार ८४० रुपये इतका आहे. (Latest Marathi News)

सोन्याचे दर

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली होती. तर आज २७० रुपयांनी वाढ झाली आहे. चैन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५०० रुपये आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४५० रुपये इतका आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८०० रुपये आहे.

Gold Price Today
Pune Crime News : बायको आणि मुलाची हत्या करत अभियंत्याने स्वत:लाही संपवलं; पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,६९० रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९५० रुपये आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८४० रुपये इतका आहे. तर कोलकत्तामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८०० रुपये आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,६९० रुपये इतका आहे.

Gold Price Today
Car Accident : मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

चांदीचे दर

सोन्यासह चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज सोन्यापेक्षा चांदीचे भाव जास्त वाढले आहेत. आज १ किलो चांदीच्या किंमती तब्बल ६०० रुपयांनी वाढल्या आहेत. चांदीचा आजचा भाव प्रति किलो ६९,८०० रुपये इतका आहे. मुंबईमध्ये आज चांदीचे दर ६९,८०० रुपये इतके आहेत. तर चेन्नईमध्ये प्रति किलो ७३,१०० रुपये इतकी चांदीची किंमत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

दरम्यान, सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com