Gold Price; सोने आणि चांदीच्या दरात घसरण

गणेश चतुर्थी दिवशी भारतीय सराफ बाजारपेठ मध्ये सोन्याचे भाव हे कमी झाले
Gold Price; सोने आणि चांदीच्या दरात घसरण
Gold Price; सोने आणि चांदीच्या दरात घसरणSaam Tv

वृत्तसंस्था : आज गणेश चतुर्थी दिवशी भारतीय सराफ बाजारपेठ मध्ये सोन्याचे भाव Gold Price हे कमी झाले आहेत. तर चांदीचे भाव देखील कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुस्ती बघायला मिळाल्याने सोन्याच्या भावात घसरण सुरू आहे. एमसीएक्सवर MCX सोन्याची वायदे भाव कमी ०.१४ टक्क्यांनी कमी होऊन ४६,९७३ प्रति तोळावर येऊन पोहोचली आहे.

हे देखील पहा-

शिवाय चांदीच्या भावात Silver price देखील किरकोळ प्रमाणात घसरण झाल्याचे बघायला मिळाले आहे. गणेश चतुर्थी दिवशी सोन्याचे भाव हे ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मागील सोमवारी प्रति तोळा सोन्याचे भाव ४७,४५१ रुपये इतके होते. तर सोन्याचे भाव ४६,९७३ रुपये प्रति तोळा झाले आहे.

Gold Price; सोने आणि चांदीच्या दरात घसरण
Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

या हिशोबाने सोन्याचे भाव हे 500 रुपयांनी उतरले आहे. चांदीच्या भावात देखील किरकोळ तेजी बघायला मिळाली आहे. चांदीचे भाव आज ०.०५ टक्क्यांनी उतरले आहे. या घसरणी नंतर सोन्याचे भावात ६४,१५० रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. चांदीचे भाव ६५,२६१ रुपये इतके होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com