
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) सतत घसरण झाल्याचं पाहायला मिळत होतं. विशेषत: मागील आठवड्याभरात सोन्याचे दर सातत्याने घसरत होते. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्या-चांदीच्या (Silver Price) दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या पार गेला आहे. (Gold Price Today)
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी शनिवारी सोन्याचा व्यवहार 51,259 रुपयांपासून सुरू होता, मात्र, सोने खरेदीला नागरिकांनी दिलेली पसंती यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सोन्याची फ्युचर्स किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 51,350 रुपयांवर पोहोचली. गेल्या सलग सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.
चांदीच्या दरातही तेजी
दुसरीकडे सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Silver Price Today) वाढ झाल्याचं बघायला मिळालं. मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये इतका झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली.
देशातील प्रमुख 4 शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई - 24 कॅरेट सोन्याचा दर - 52,550 रुपये (प्रति तोळा)
नवी दिल्ली - 24 कॅरेट सोन्याचा दर - 52,460 रुपये (प्रति तोळा)
चैन्नई- 24 कॅरेट सोन्याचा दर - 52,700 रुपये (प्रति तोळा)
कोलकाता- 24 कॅरेट सोन्याचा दर - 52,480 रुपये (प्रति तोळा)
अशी तपासता सोन्याची शुद्धता?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळेल.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.