Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; भाव ५० हजारांच्या खाली

गुरूवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल २०० रुपयांनी घसरले.
Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Gold-Silver Price Today, Gold Silver rate Saam Tv

Gold Price Today : मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold) दरात चढउतार सुरू आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर सुद्धा दिसून येत आहे. आज म्हणजेच गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गुरूवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल २०० रुपयांनी घसरले. (Gold Silver Price Today)

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Video: स्कुटीवरून मुलगी थेट 5 फूट हवेत उडाली; वाचा नेमकं काय घडलं?

सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver) दरातही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचा भाव ७८६ रुपयांनी घसरून प्रतिकिलो ५७ हजार २४४ रुपये इतका झाला. दिल्लीच्या सराफा बाजारात गुरूवारी एक तोळा सोन्याचे दर ४९ हजार ८१५ इतके झाले आहेत. दुपारी सराफा बाजारत सोन्याचा दर ५० हजारांच्या खाली आला असला तरी, संध्याकाळपर्यंत या दरात बदल देखील होऊ शकतो.

पितृपक्षात सोन्याचे दर घसरत असले तरी, नवरात्रीपर्यंत पुन्हा हे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनं खरेदी करायचं असेल तर पितृपक्षातील अष्टमीला करावं असं म्हणतात. सोन्याचे दर घसरल्याने तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ही चांगली संधी आहे. सणासुदीच्या काळात पुन्हा सोन्याला झळाळी येऊ शकते. (Gold Silver Latest Price Today In India)

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Viral : चुकून एक्सीलेटर फिरवला अन् स्कूटीवरून धाडकन आदळली तरुणी, VIDEO व्हायरल

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, मुंबईत २२ कॅरेट सोन्याची दर प्रतितोळा प्रतितोळा ४६,३९० रुपये आहे. याशिवाय मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रति १० ग्रॅमचा दर ५७० रुपये आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com