Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युध्दामुळे सोने- चांदीचे दर गगनाला; जाणून घ्या आजचे दर

सोमवारी सोन्याचे भाव 53 हजारांच्या पुढे गेले. सोनं 1.99 टक्क्यांनी वाढलं आहे.
Gold Price
Gold Pricesaam tv

रशिया-युक्रेन (Russia) मध्ये मागिल बारा दिवसांपासून युध्द सुरु आहे. या युध्दाचा परिणाम जगावर झालायं. आज सोमवारी या युध्दाचा परिणाम शेअर मार्केट, कच्चे तेल, सोनं, (Gold Rate) चांदीचे दर यावर दिसून आला. युध्दामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये वाढ सुरु आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 53 हजारांच्या पुढे गेला. त्यात 1.99 टक्के वाढ झाली असून सोन्याचा भाव 53,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचे दर 70 हजारांवर गेले आहेत. सोमवारी चांदीच्या किंमतीमध्ये 2.37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचे दर 70,800 रुपये प्रति किलो झाला आहे.

Gold Price
Russia Ukraine War:युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार

दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही ठिकाणी 18 कॅरेट सोने देखील वापरले जाते. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवलेले असते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते.

शेअर बाजारात कमालीची घसरण

शेअर बाजारात (Share Market) कमालीची घसरण सुरू आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 77 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. अमेरिका आणि त्याच्या युरोपीय मित्र देशांनी रशियन तेलावर निर्बंध लादले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com