सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरणSaam Tv

सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

सोन्याचा भाव प्रतितोळा ४७,७८३ रुपया

नवी दिल्ली - सध्या सोने Gold आणि चांदीच्या Silver दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सोन्याचा दर Rate सातत्याने ४७,००० रुपये प्रतितोळा या पातळीच्या आसपास आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा १०६ रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या Gold Market सोन्याच्या दरामध्ये आज ०.२२ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा ४७,७८३ रुपया इतका झाला आहे. सोन्यापाठोपाठ आज चांदीचे दर देखील ०.०७ टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे चांदीचे दर प्रतिकिलो ६८,२८१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हे देखील पहा -

मात्र, आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आता उत्तम वेळ असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाचे संकट, त्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळेअर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे नागरिक आता सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्ष गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल ६९०० कोटी गुंतवणूक केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com