Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark priceSaam tv

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही उतरले; पाहा आजचा भाव

सराफा बाजार उघडात सोन्याच्या किंमती घसरल्या.

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या (Gold) धातूच्या किंमतीत चढउतार होत आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी (Silver) दरात घसरण होत आहे. शुक्रवारी सकाळी सुद्धा भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. सराफा बाजार उघडात सोन्याच्या किंमती घसरल्या. (Gold Silver Price Today In India)

Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
Lion Fight : सिंहिणीसाठी दोन सिंहामध्ये जबरदस्त लढाई; VIDEO पाहून थरकाप उडेल

आजचे सोन्या चांदीचे दर

मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेंजवर शुक्रवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 186 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार 908 इतके झाले आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे दरातही जवळपास 200 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे दर प्रतिकिलो 55 हजार 697 रुपये इतके झाले.

जागतिक बाजारात सोने चांदीचा भाव

जागतिक स्तरावर बोलायचे झाले, तर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या वायदे आणि स्पॉटच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते, कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 1.16 टक्क्यांनी घसरली. चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर 1.49 टक्क्यांनी कमी झाले. (Gold Silver Price Today)

Gold Silver Hallmark, Gold hallmark, BIS hallmark, Gold hallmark price
Viral Video : 'छम्मा छम्मा' गाण्यावर एअर हॉस्टेसचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

असा तपासा सोन्याचा भाव

आता सोन्या बरोबरच चांदीचे दरही तुम्ही घसबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्या-चांदीचे नवीनतम दर पाहू शकता.

दरम्यान, चांगल्या मागणीमुळे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान देशातील सोन्याची आयात 6.4 टक्क्यांनी वाढून $12.9 अब्ज झाली आहे, ज्याचा देशाच्या चालू खात्यातील तूटवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीत $12 अब्ज किमतीचे सोने आयात करण्यात आले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com