सोन्याच्या दरात मोठी उसळी; चांदीलाही आली नवी चमक, पाहा आजचा भाव

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली.
सोन्याच्या दरात मोठी उसळी; चांदीलाही आली नवी चमक, पाहा आजचा भाव
Gold Silver Price, Gold Silver Rate TodaySaam tv

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या (Gold) दरात घसरण सुरू आहे. मात्र असं असताना देखील गुरूवारी सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Price) दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा मोठी उसळी घेत 51 हजारांचा टप्पा पार केला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गुरूवारी सकाळी चांदीचा दर प्रतितोळा 61 हजारांच्या पार गेला आहे. (Gold-Silver Price Latest News)

Gold Silver Price, Gold Silver Rate Today
पावसाळ्यात फोनला भिजण्यापासून कसे वाचवाल?

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 204 रुपयांनी वाढून 50,642 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 50,650 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवरून सुरू झाला होता. आज देशांतर्गत बाजारात सोन्याला मागणी आहे, त्यामुळे कालच्या बंद किमतीपेक्षा 0.40 टक्क्यांनी वाढ होत आहे.

चांदीचे दर 61 हजारांच्या पार

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 363 रुपयांनी वाढून 61,060 रुपये किलो झाला. याआधी चांदीचा व्यवहार 61,233 रुपये प्रति किलोने सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्यामुळे फ्युचर्सचे भाव थोडे खाली आले. तथापि, मागील बंद किंमतीपेक्षा 0.60 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे.

Gold Silver Price, Gold Silver Rate Today
देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत आढळले 12 हजारांहून अधिक रुग्ण, 11 मृत्यू

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण

भारतीय वायदे बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात उसळी दिसून येत असताना, आज जागतिक बाजारात सोन्याचे दरात घसरण बघायला मिळाली. यूएस मार्केटमध्ये, सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 1,830.36 डॉलर प्रति औंस होती. ही मागील बंदच्या तुलनेत सुमारे 0.18 टक्के कमी आहे. सोन्याबरोबरच चांदीची स्पॉट किंमत 21.66 डॉलर प्रति औंसवर आली. यामध्ये देखील मागील बंद किमतीपेक्षा 0.27 टक्के घसरण दिसून आली.

जागतिक बाजारात सोन्याचे भाव का कोसळले?

यूएस फेड रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ केली आहे, ज्याचा परिणाम तेथील शेअर आणि सराफा बाजारावरही दिसून येत आहे. अमेरिकेतील रोखे उत्पन्नात घट झाल्याने गुंतवणूकदारांना आता अधिक व्याजाची अपेक्षा आहे आणि ते सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक कमी करत आहेत. यामुळेच आज जागतिक बाजारात सोन्याची मागणी कमी होती, त्यामुळे त्याच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com