
Gold Silver price Today : सोन्याच्या भावात गेल्या दोन-तीन दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दर आज प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१५० रुपये इतकी झाली आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी प्रति किलो ६५,७०० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. (Latest cMarathi News)
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईत (Mumbai) २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ५२,१५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,८९० रुपये प्रति तोळा आहे. तर पुण्यात प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचा भाव ५२,१५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,८९० रुपये आहे.
नागपुरात प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,८९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० आहे, तर प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,९६० रुपये आहे. तर आज चांदीचा प्रति तोळा दर ६५७ रुपये आहे. तर आज चांदी प्रति किलो ६५,७०० रुपयांनी विकली जात आहे.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.
शुद्ध सोने कसे ओळखावे?
सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.