Gold Silver Price : सोने स्वस्त तर चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा भाव

बाजारपेठ सुरू होताच सोन्याचा भाव 50,977 रुपये इतका होता.
Gold Silver Price  : सोने स्वस्त तर चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver PriceSaam Tv

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Price) दरात चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर अस्थिर आहे. आजही जागतिक बाजारात सोन्याच्या (Gold) दरात घट झाली. शुक्रवारी सकाळी सोन्याच्या फ्युचर्स किमतीत थोडीशी घसरण झाली. मात्र असं असलं तरी सोन्याचे दर 51 हजारांच्या आसपास आहे. सोन्याबरोबर चांदीचे दरही 62 हजारांवर गेले आहेत. (Gold-Silver Price Latest News)

Gold-Silver Price
कोरोनानं टेन्शन वाढवलं! देशात सलग दुसऱ्या दिवशी आढळली मोठी रुग्णसंख्या; १४ मृत्यू

शुक्रवारी सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत प्रतितोळा 6 रुपयांनी घसरून 50,980 रुपये इतकी झाली. याआधी बाजारपेठ सुरू होताच सोन्याचा भाव 50,977 रुपये इतका होता. मात्र मागणी कमी झाल्याने तो 0.01 टक्क्यांनी घसरला. जागतिक शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याने आगामी काळात सोन्याची मागणी पुन्हा वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चांदीच्या दरात वाढ

सोन्याप्रमाणे आज चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 51 रुपयांनी वाढून 61,578 रुपये प्रतिकिलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 61,415 रुपयांच्या भावाने सुरू झाला होता. मात्र, मागणी वाढल्यानंतर लगेचच चांदीच्या दरात 0.08 टक्क्यांनी वाढ झाली. जगभरातील देशांमध्ये औद्योगिक उपक्रम सामान्य होत असल्याने येत्या काळात चांदीच्या मागणीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold-Silver Price
कच्चा तेलाच्या दरात पुन्हा घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

दरम्यान, जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. अमेरिकन बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दराने उसळी घेतली. जागतिक बाजारात आज सकाळी सोन्याचा स्पॉट किमती 0.28 टक्क्यांनी घसरून 1,845.96 डॉलर प्रति औंस झाला. सोन्याबरोबरच चांदीची स्पॉट किंमत 0.02 टक्क्यांनी वाढून 21.88 डॉलर प्रति औंस झाली होती.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com