Aadhaar Card Updates : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; निवडणुकीआधीच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

Aadhaar Card Updates : मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. आधार कार्डधारकांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Online Aaadhar Updates
Online Aaadhar Updates Saam Tv

Online Aadhaar Card Updates : आगामी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना मोदी सरकारने निर्णयाचा धडाका लावला आहे. देशभरातील नागरिकांना स्वस्तात सोयीसुविधा मिळाव्या यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अशातच, मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. आधार कार्डधारकांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Online Aaadhar Updates
Weather Today : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; पुढील तीन दिवस आणखी धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

सरकारी काम असो की खासगी काम असो. किंवा ओळखपत्र म्हणून सुद्धा आधार कार्ड (Aadhar Card) आता आवश्यक झाले आहे. त्यामुळे मुला मुलीच्या जन्मानंतर लगेच आधार कार्ड काढले जात आहेत. परंतु, तुम्ही आधार कार्ड काढून १० वर्ष पूर्ण झाली असतील तर त्याला अपडेट् करणे गरजेचे आहे.

आधार अपडेट करण्यासाठी यापूर्वी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. मात्र, मोदी सरकारने आता आधार अपडेट करणे फ्री केले आहे. म्हणजेच काय तर, आता यापुढे ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता फुकटात हे अपडेट करता येवू शकणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे. (PM Narendra Modi)

पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणाऱ्याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे. ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Online Aaadhar Updates
Buldhana News : खळबळजनक! 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', स्टेटस ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाची आत्महत्या

आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये फी तात्पुरती थांबवली आहे. आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु, आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही.

ऑनलाईन आधार अपडेट कसे कराल?

  • सर्वात आधी myAadhaar portal वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागणार आहे.

  • एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. नंतर Send OTP वर क्लिक करा.

  • या नंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.

  • तुम्हाला तुमचा पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.

  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com