सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ; पगारवाढ लवकरच, DA आणि DR किती वाढणार? जाणून घ्या...

Government Employees Dearness Aallowance -Dearness Relief : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी काही दिवसांत आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
Government Employees Dearness Aallowance -Dearness Relief
Government Employees Dearness Aallowance -Dearness ReliefSAAM TV

Government Employee Salary Hike: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी काही दिवसांत आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

मार्च २०२३ मध्ये किरकोळ महागाई ६ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवरून कमी होऊन ५.६६ टक्क्यांपर्यंत आली आहे. मात्र, आरबीआयने निश्चित केलेल्या ४ टक्के लक्ष्यापासून अद्याप दूरच आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन सरकार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए आणि डीआर देतं.

Government Employees Dearness Aallowance -Dearness Relief
Aadhar-Bank Account Link : तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ? आता घरबसल्या कळेल, फॉलो करा स्टेप

याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. ती वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू झाली होती. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढून ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. ती वाढ जुलैपासून लागू करण्यात आली होती.

Government Employees Dearness Aallowance -Dearness Relief
Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनते दररोज 333 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार

रिपोर्टनुसार, आता महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांची वाढ होईल अशी अपेक्षा आहे. ती जुलैपासून लागू होईल. ताज्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारचे ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारक आहेत. तसेच सरकार सीपीआय आणि आयडब्ल्यूच्या डेटानुसार महागाई भत्त्याचे (Dearness Allowance) दर निश्चित करतं.

दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित डीए आणि डीआरमध्ये जाहीर करण्यात येतो. महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो. तर डीआर पेन्शनधारकांना दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे डीए दिला जातो. तर डीआर हा मूळ निवृत्तीवेतनानुसार दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com