
मुंबई: पगारवाढीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी (Good News) आहे. या वर्षी सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात चांगली पगारवाढ (Salary) मिळू शकते. टीमलीजच्या रिपोर्टनुसार या वर्षी सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Hike) होऊ शकते. द जॉब अॅण्ड सॅलरी प्राईमरच्या रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षातली सर्वात मोठी पगारवाढ यावर्षी होणार आहे.
रिपोर्टनुसार यावर्षी सर्वा कर्मचाऱ्यांचा पगार हा ८.१३ टक्क्यांनी वाढू शकतो. एका अभ्यासात जवळपास १७ क्षेत्रांची समीक्षा केली गेली. यात १४ क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पगारवाढ मिळण्याच शक्यता आहे. तर एकूण सरासरी ही ८.१३ टक्के इतकी असणार आहे. टीमलीज सर्व्हिसेस या संस्थेने एका वार्षिक अहवालात १७ क्षेत्र आणि ९ शहरांमधल्या २,६३,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत काळजी घेतली गेली. (Good news for those waiting for a pay rise; Salary will increase by 'so much' percentage)
हे देखील पाहा -
या शहरांत मिळणार १२ टक्क्यांहून अधिक पगारवाढ
अहवालानुसार भौगोलिक आधारावर सर्वात जास्त पगारवाढ आणि १२ टक्के किंवा त्याहूनही अधिक पगारवाढ देणाऱ्या शहरांमध्ये अहदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. याशिवाय पगारवाढीत दरवर्षी १० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ देण्यात ई-कॉमर्स, टेक्नलॉजी स्टार्टअप, आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान यांसारखे क्षेत्र समाविष्ट आहेत.
या क्षेत्रात १० टक्क्यांहून कमी पगारवाढ
अहवालात सांगण्यात आलंय की, शेती आणि अॅग्रोकॅमिकल्स, ऑटोमोबाईल आणि यासंबंधीत बॅंकिंग, वित्तीय सेवा, बीपीओ, आयटी एनबेल्ड सेवा, बांधकान आणि रियल इस्टेट, शैक्षणिक सेवा. फास्ट मुव्हींग कंज्यूमर गुड्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरींग आणि एलाएड, मीडिया आणि मनोरंजन,उर्जा, रिटेल, टेलिकम्यनिकेशन क्षेत्रात १० टक्क्यांपेक्षा कमी पगारवाढ मिळणार आहे.
पगार कपातीचे दिवस गेले
टीमलीज सर्व्हिसेस त्या उप-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या की, सध्या पगारवाढ १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण, ही चांगली गोष्ट आहे की, पगार कपातीचे दिवस आता गेले आहेत. रिवाइवलसह विविध क्षेत्रांतून मागणी वाढल्याने पगारवाढीची मागणीही स्तर प्री-कोविड स्तरावर पोहोचण्याच्या जवळ आहे.
अहवालात एका ट्रेंडवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या नोकऱ्यांबाबत इंडिया इंकच्या चक्रवर्ती म्हणाल्या की, २०२०-२१ मध्ये १७ क्षेत्रातील केवळ पाच क्षेत्रांनी हॉटजॉहबची भूमिका बजावली होती. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९ क्षेत्रांनी कटिंग एज किंवा न्यू एजची भूमिका निभावली होती. कंपनी कुशल कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देत आहे. तसेच अति-कुशल कर्मचाऱ्यांच्या पगारात ११ ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.