दीड वर्षात १० लाख जणांना नोकऱ्या देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे
दीड वर्षात १० लाख जणांना नोकऱ्या देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
PM Narendra ModiSAAM TV

नवी दिल्ली : कोरोना संकटात अनेकांच्या हातचं काम गेलं, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. आता या संकटावर मात करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने योजना आखली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख पदांची भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित विभागांना दिले आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आली आहे. (PM Modi Government 10 Lakh Jobs Latest Marathi News)

PM Narendra Modi
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठ विधान, म्हणाले...

कोरोना संकटात अनेकांच्या हातचं काम गेलं. अनेक जण बेरोजगार झाले. देशातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच दोन वर्षात कुठलीही मोठी पदभरती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. हजारो रिक्त पदं केंद्र सरकारमध्ये असून ही पदभरती केव्हा केली जाणार, असा सवालही उपस्थित केला जात होता.

रोजगाराच्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या मोदी सरकारने आता या संकटावर मात करण्यासाठी योजना आखली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख जणांना रोजगार दिला जाणार आहे. तसे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. येत्या दीड वर्षामध्ये दहा लाख लोकांची पदभरती करण्याचं ध्येय केंद्र सरकारकडून ठेवण्यात आलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून १० लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि त्यासोबत निर्णयही जाहीर होण्याची शक्यता आहे.

नोकरभरतीसाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. नोकरीचं मिशन मोड राबवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पावलं उचलण्याची शक्यता आहे. पीएमओकडून करण्यात आलेल्या या घोषणेनं अनेकांच्या जीवात जीव आला आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलेल्यांसाठी येत्या काही दिवसांतच सुवर्णसंधी निर्माण होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com