रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

20 जुलैपर्यंत जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
Ration Card
Ration Card Saam Tv

नवी दिल्ली : तुम्ही जर रेशनकार्डधारक (Ration Card) असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) रेशन कार्डधारकांसाठी नवनवीन योजना आणत असते. आता ज्या व्यक्तीकडे अंत्योदय रेशनकार्ड आहे अशा व्यक्तीसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (Ration Card Marathi News)

Ration Card
Gold Silver Price Today : सोनं, चांदी झालं स्वस्त; पाहा किती आहे आजचा भाव

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी शासनाकडून जिल्हा व तहसील स्तरावरील सामुदायिक आरोग्य केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत अंत्योदय कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांची आयुष्मान कार्ड बनवण्याचे ध्येय आहे.

याशिवाय जनसुविधा केंद्रांवरही ही सुविधा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शिधापत्रिका (अंत्योदय शिधापत्रिका) दाखवून येथेही आयुष्मान कार्डसाठी अर्ज करता येईल. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारने सर्व अंत्योदय कार्डधारकांचे आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. 20 जुलैपर्यंत जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. (Ration Card Latest News)

Ration Card
पत्नी वारंवार पोलीस तक्रार, आत्महत्येची धमकी देत असेल तर तो पतीवर अत्याचार : हायकोर्ट

ज्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड नाही. असे कार्डधारक 20 जुलैपर्यंत त्यांची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पात्र लाभार्थी सार्वजनिक सेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी संलग्न खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्योदय शिधापत्रिका दाखवून त्यांच्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड मिळवू शकतात.

सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नाहीत. या योजनेत ज्यांची नावे आधीपासूनच आहेत त्यांचीच कार्डे विभागाकडून बनवली जात आहेत. अंत्योदय कार्डधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास उपचारासाठी रुग्णालयांमध्ये भटकावे लागू नये हा शासनाचा मानस आहे. त्यासाठी शासनस्तरावरून विविध जिल्ह्यांतील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Edited By -Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com