Fatima Sheikh: यांचा Google Doodle द्वारा गाैरव

अखेर पर्यंत त्या या चळवळीच्या अजिंक्य माेहरा ठरल्या.
Fatima Sheikh: यांचा Google Doodle द्वारा गाैरव
google honours feminist icon educator fatima sheikh with a doodlegoogle

सातारा : गुगलने आज डूडलद्वारे (google doodle) देशातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या फातिमा शेख (fatima sheikh) यांचा गौरव करत आहे. आद्यप्रवर्तक आणि समाजसुधारक ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांच्यासमवेत सन १८४८ मध्ये शेख यांनी स्वदेशी ग्रंथालयाची स्थापना केली. ही भारतातील मुलींसाठीची पहिली शाळा (school) मानली जाते. google honours feminist icon educator fatima sheikh with a doodle

google honours feminist icon educator fatima sheikh with a doodle
Satara Crime News: १४ काेटींचा अपहार, १८ जणांचा अटकपुर्व जामीन फेटाळला; पुण्यातल्यांचाही समावेश

फातिमा शेख यांचा जन्म १८३१ साली पुण्यात (pune) झाला. फातिमा त्यांच्या भाऊ उस्मान सोबत राहत असे. फातिमा यांनी खालच्या जातीतील (lower caste) मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना व उस्मानला समाजाने बेदखल केले. त्यानंतर दाेघांनी त्यांचे घर फुलेंसाठी उघडले. या दरम्यान शेख यांच्या घरात देशी वाचनालय खूले करण्यात आले. तेथे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी उपेक्षित दलित आणि मुस्लिम महिला आणि मुलांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला.

समानतेचे चळवळ रुजावी यासाठी शेख या घरोघरी जाऊन त्यांच्या समाजातील वंचितांना स्वदेशी ग्रंथालयात शिकण्यासाठी आणि भारतीय जातिव्यवस्थेच्या कठोरतेपासून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. सत्यशोधक चळवळीत (Satyashodhak movement) सामील असलेल्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रबळ वर्गाकडून मोठा प्रतिकार झाला, परंतु शेख आणि त्यांचे सहकारी यांनी जिद्द साेडली नाही. अखेर पर्यंत त्या या चळवळीच्या अजिंक्य माेहरा ठरल्या.

भारत सरकारने सन २०१४ मध्ये फातिमा शेख यांच्या कर्तृत्वावर उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये इतर यशस्वी शिक्षकांसह त्यांचे प्रोफाइल वैशिष्ट्यीकृत करून त्यांच्या कार्यावर प्रकाशझाेत टाकला.

edited by : siddharth atkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com