उत्तर प्रदेश सरकारचं मुंबईत कार्यालय; राज ठाकरेंची भूमिका काय? दरेकरांनी सांगितलं...

Pravin Darekar On Uttar Pradesh Office : राज ठाकरेंबद्दल उत्तर भारतीयांची काय भावना आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दरेकरांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश सरकारचं मुंबईत कार्यालय; राज ठाकरेंची भूमिका काय? दरेकरांनी सांगितलं...
Government of Uttar Pradesh office in Mumbai; What is the Reaction of Raj Thackeray?Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई: उत्तर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी मुंबईत कार्यालय सुरु करण्याच्या निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घेतला आहे. याबाबत कॉंग्रसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. सावंत म्हणाले की, युपी सरकारने मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मुंबई मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी योगी सरकारच्या या निर्णयावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंबद्दल उत्तर भारतीयांची काय भावना आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (UP govt to open their office for UP residents living in Mumbai; office to look after their jobs, interests and other conveniences)

हे देखील पाहा -

प्रवीण दरेकरांची सावध भूमिका

मुंबईत उत्तर प्रदेशच्या नागरिकांसाठी कार्यालय सुरु करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सावध भूमिका घेतलीये. दरेकर म्हणाले की, मुंबईत उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेश येथील लोकांच्या भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. ही भाजप ची भूमिका नसेल असे वाटते. त्याचप्रमाणे उत्तर भारतीयांची राज ठाकरेंबद्दल (Raj Thackeray) आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत काय भूमिका आहे, हे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जाणून घेणार आहेत अशी माहिती दरेरांनी दिली आहे.

सचिन सावंतांची भाजपवर टीका

योगी सरकारच्या या निर्णयाबाबत कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. सचिन सावंत म्हणाले की, युपी सरकारने मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मुंबई मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. युपीचे असंघटित कामगार अनेक राज्यांत आहेत. गुजरात, दिल्ली पंजाबमध्ये का उघडले नाही? दरडोई उत्पन्न देशात कमी असल्याने मजूर स्थलांतरित होतात. कोरोना काळात वाऱ्यावर सोडले. आता आठवण झाली? असा खोचक सवाल सावंत यांनी भाजपला विचारल आहे.

उत्तर प्रदेश कार्यालयाचा उपयोग काय?

महाराष्ट्रात राहत असलेल्या उत्तर भारतीयांच्या हितासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकार कार्यालय सुरु करणार आहे. मुंबईत उत्तर प्रदेशातील लाखो कामगार राहतात आणि ते सर्व असंघटीत आहेत. त्यांच्या न्याय-हक्कांसाठी योगी सरकार हे कार्यालय सुरु करणार आहेत. उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी कार्यालय प्रयत्न करणार आहे. तसेत आपात्कालीन परिस्थितीत या कार्यालयामार्फत मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मदत केली जाणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.