Punjab: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

घटनास्थळी पोलीस दल हजर असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
Punjab: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला
Punjab: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्लाTwitter

पंजाबमधील पठाणकोटमधील धिर पुलाजवळ आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा ग्रेनेड फेकल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दल हजर असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

या स्फोटानंतर पठाणकोट आणि पंजाबमधील सर्व पोलीस चौक्यांना अलर्ट करण्यात आले आहे.यासोबतच पठाणकोट एअर फोर्स स्टेशन आणि इतर आर्मी कॅम्पभागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून ग्रेनेडचे काही तुकडे जप्त केले आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com