Ratan Tata Love Story: आपल्या कर्तुत्वाने जग जिंकणारा प्रेरणादायी उद्योजक प्रेमात मात्र अपयशी; अशी होती रतन टाटांची फिल्मी लवस्टोरी

प्रसिद्ध उद्योगपती पद्मभूषण, पद्मविभूषण मा. रतन टाटांचा आज वाढदिवस...
Ratan Tata
Ratan TataSaam Tv

Ratan Tata Birthday: भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रेरणादायी, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे नाव घेतले जाते. भारतातील यशस्वी उद्योजक, फक्त उद्योग जगतातच नव्हेतर सामाजिक क्षेत्रातही ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने आदर्श निर्माण केला, असे आदर्श, उद्योजक रतन टाटा यांचा आज वाढदिवस.

उद्योग जगतात नावलौकिक मिळवणारे रतन टाटा आजही अविवाहीत आहेत. अमाप पैसा प्रतिष्ठा मिळवणाऱ्या टाटांनी एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमाचा किस्सा सांगितला होता. (Ratan Tata)

Ratan Tata
Ajit Pawar : अजित पवारांना मुंबई जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून स्पेशल सोय; नेमकं कारण काय?

मुंबईमध्ये जन्मः दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव सुनी टाटा आणि वडिलांचे नाव नवल टाटा होते. रतन टाटांनी कॉर्नेल युनिवर्सिटीमधून आर्किटेक्चर आणि स्टक्चरल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली होती. आपल्या कौटुंबिक व्यवसायात त्यांनी थेट मोठ्या पदावर काम न करता एक कर्मचारी म्हणून सुरूवात केली होती. ज्यामध्ये ते कंपनीमध्ये एका विभागात कर्मचारी म्हणून काम करत होते.

टाटा उद्योग समूहाची (Tata Group) कमान सांभाळण्यााधी त्यांनी 70 च्या दशकात जमशेदपूरमधील टाटा स्टिलमध्ये काम केले. कामातील बारकावे शिकून घेतल्यानंतर त्यांनी टाटा उद्योग समूहाच्या धुरा हाती घेतल्या. ते 1991 मध्ये टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले.

Ratan Tata
Crime News : लहान दीराकडून वहिनीचं अपहरण; मित्रासोबत मिळून केला अत्याचार, काळीमा फासणारी घटना

रतन टाटांची प्रेमकहाणी:

वयाची ८० वर्ष पुर्ण केली तरीही आजही टाटा अविवाहीत आहेत. परंतु रतन टाटा यांनी लग्न केले नसले तरी त्यांच्या लवस्टोरीचा किस्सा चांगलाच गाजला होता. त्यांची ही प्रेमकहाणी लॉस एंजेलिसमध्ये एका कंपनीत काम करताना सुरू झाली होती. परंतु या प्रेमकहाणीचा शेवट मात्र लग्नाने होऊ शकला नाही. रतन टाटांनी प्रेम केलेल्या मुलीशी ते लग्न करणार होते. मात्र त्याचवेळी त्यांच्या आजीची तब्बेत खराब झाल्याने त्यांना भारतात यावे लागले. यावेळी ती मुलगीही त्यांच्यासोबत भारतात येईल असे त्यांना वाटले होते.

मात्र 1962 च्या भारत- चीन लढाई सुरू होती. त्यामुळे तिच्या आई वडिलांचा भारतात येण्यास नकार होता. या कारणामुळेच रतन टाटांची ही प्रेमकहाणी अपुर्ण राहिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com