ऑंsss काय सांंगता! नवरदेव स्वतःच्या लग्नाला जायलाच विसरला; दुसऱ्या दिवशी नवरीकडे गेला, तिथं जे झालं...

Viral News : बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे.
marriage (representative photo)
marriage (representative photo)saam tv news

Bihar News: लग्न म्हटलं की तयारी आणि इतर लगबग त्यामुळे झोप येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र एक नवरदेव लग्नाच्या आदल्या दिवशी दारु पिऊन असा गाठ झोपला की तो लग्नाला जायलाच विसरुन गेला. बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे.

नवरदेव नशा उतरल्यावर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सासरवाडीला पोहोचला. त्याला पाहताच मुलीकडच्या मंडळींचा राग अनावर झाला आणि थोडा गोंधळ निर्माण झाला. यानंतर मुलाने मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तिने नकार दिला. (Latest News)

marriage (representative photo)
Maharashtra Government : सरकार पडण्याच्या भीतीनंच मंत्रालयात लगबग; महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

यानंतर मुलाकडच्यांनी लग्नाचा आग्रह धरला. मुलीकडील गावकऱ्यांनी नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना डांबून ठेवलं. लग्नाच्या तयारीसाठी झालेला खर्च देण्याची मागणी त्यांनी केली. मुलीकडच्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी पैसे देणे मान्य केलं आणि तिथून सुटका करुन घेतली.

marriage (representative photo)
Crime News: थरारक! आधी महिलेची हत्या केली मग काळीज शिजवून खाल्लं

लग्नाच्या दिवशी नवरदेव दारूच्या नशेत आढळल्याने माझ्या कुटुंबीयांची समाजात बदनामी झाली आहे. मुलगा आधीच दारूच्या आहारी गेला असेल तर पुढे काय होईल माहीत नाही. मी समाजातील सर्व मुलींना आवाहन करते की, अशा दारुड्या मुलाशी अजिबात लग्न करू नका, असं मुलीने म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com