
धार : बहुतांश लग्नामध्ये नवरदेव शेरवानी घालताना दिसतात. सध्या लग्नात शेरवानी घालणे सर्वसामान्य झालं आहे. मात्र, एका नवरदेव तरुणाला स्वत:च्या लग्नात (Marriage) शेरवानी घालणे चांगलेच महागात पडलं आहे. नवरदेवाने शेरवानी (Sherwani) घातल्याने वधू पक्षातील लोकांनी नवरदेवाच्या पाहुण्यांना चांगलाच चोप दिला आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) धार जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सदर प्रकारानंतर पोलिसांनी वर-वधू या दोन्ही पक्षांवर गुन्हा नोंद केला आहे. (groom wearing a sherwani instead dhoti-kurta in marriage due to fight between two parties)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, मांगबयडा गावात धारमधून वरात येत होती. आदिवासी समाजाच्या नवरदेव तरुणाने या वरातीत शेरवानी घातली होती. मोठ्या दिमाखात तरुणाची वरात निघत होती. वरात लग्न मंडपाजवळ येताच वधूच्या पक्षाने नवऱ्याच्या शेरवानी घालण्यावर आक्षेप घेतला. कारण, आदिवासी परंपरेनुसार नवरदेवाने लग्नासाठी धोतर-कुर्ता घातला पाहिजे, असे लग्नातील वधू पक्षातील लोकांचे म्हणणे होते. यावरून दोन्ही पक्षामध्ये विवादालाच सुरुवात झाली.
परंपरेवरून वर-वधू पक्षात वाद
दरम्यान, नवरदेव सुंदरलाल हा लग्न मंडपात सप्तपदी घेण्यासाठी पोहोचला, त्यावेळी नवरीची काकू झीग्गुबाईने देखील परंपरेचा संदर्भ देत शेरवानीवर आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, पंरपरेनुसार कुळदेवीसमोर नवरदेव धोतर-कुर्ता घालूनच सप्तपदी घेतात, असे त्यांनी सांगितले. परंपरेला छेद दिला म्हणून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला. पुढे त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झाले. तसेच एकमेकांवर दगडफेक देखील केली. त्यामुळे काही वरातीतील लोक पळून गेले. या तुंबळ हाणामारीमध्ये चारजण जखमी झाले. या सदर प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
वर-वधू पक्षावर झाला गुन्हा नोंद
धामनोद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील यदुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धारमधून मांगबयडा येथे वरात आली होती. या लग्न सोहळ्यासाठी नवरदेव तरुणाने शेरवानी घातली होती. मात्र, आदिवासी परंपरेनुसार लग्नात नवरदेवाने धोतर-कुर्ता घालणे अशी परंपरा आहे. त्यामुळे वर-वधू पक्षात वाद झाले, त्याचेच रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.